पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरातील तक्का परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराकडुन रेल्वे स्टेशन कडे जाणा-या रोडवरील क्रिकेट मैदानाच्या जवळील फुटपाथवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
सदर इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष असून डोक्याचे केस मध्यम काळे, दाढी मिशी वाढलेली, अंगाने सडपातळ, चेहरा उभट आहे. तसेच अंगात पांढ-या रंगाची बनियान व खाकी रंगाची हाफ पेन्ट घातलेली आहे.
सदर इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे क्र ०२२-२७४६२३३३ किंवा सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे यांच्याशी संपर्क साधावा.