तरुणांनी दिले अजगराला जीवदान…

महाड : महाड शहरातील नवेनगर परिसरातील तरुणांनी सात फुटी अजगराला पकडून जीवदान दिले.
अजगर म्हटलं की अनेकांची भंबेरी उडते, परंतु नवेनगर येथे एका बिल्डींग खाली आलेल्या सात फुटी अजगराला दीपक महाडिक, अजित सुतार, नितेश (भाई) गोळे, प्रसाद सँडकर यांनी पकडून जीवदान दिले.
बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोपाळ सोसायटी जवळ नवेनगर येथे या तरुणांनी अजगर असल्याचे समजताच त्यांनी तातडीने तेथे पोहचून अजगराला कोणतीही इजा न होता पकडून जवळच असलेल्या जंगलात सोडून दिले. त्यांच्या कृत्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.