कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी ,शेकाप,आघाडीला भरघोस यश प्राप्त झाले असून संपन्न झालेल्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार रविंद्र रामचंद्र मरवडे सह सात सदस्य हे बहुसंख्ये मतांनी विजयी झाले आहे.
साऱ्या तालुक्याच्या नजरा लागून राहिलेल्या तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीवर अखेर राष्ट्रवादी,शेकाप, भाजप,आघाडीने बाजी मारत शिवसेना ग्राम विकास आघाडीचे पानिपत करत वर्षस्व गाजवले त्यामुळे चिल्हे आणि तळवली हे गड राखण्यात आघाडीचे नेतेमंडळी यशस्वी ठरले आहेत.18 डिसेंबर रोजी ग्राम पंचायतीच्या थेट सरपंच पद सह सदस्य पदांची निवडणूक संपन्न झाली त्याचा निकाल आज 20 डिसेंबर रोजी जाहीर झाला यात थेट सरपंच पदासह आघाडीचे सात सदस्य हे बहुसंख्येने निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे थेट सरपंच म्हणून रविंद्र रामचंद्र मरवडे,तर प्रभाग क्रमांक एक मध्ये संदीप दत्ताराम महाडिक हे आधीच बिन विरोध निवडून आले होते तर उर्वरित दोन जागेसाठी या ठिकाणी तीन उमेदवार निवडणु रिंगणात उभे ठाकले होते यात सौ अनघा अभिजित खांडेकर ,व सौ सुकासिनी ठमाजी महाडिक ह्या निवडून आले तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये दयाराम मरवडे व सौ तारामती पवार तर प्रभाग क्रमांक तीन मधून सौ नीलम वाळंज व हरिश्चंद्र मांगुलकर हे विजय झाले आहेत.
सदर च्या ग्राम पंचायतीमध्ये रायगडचे खासदार सुनील तटकरे,आ.अनिकेत तटकरे,आ.अदिती तटकरे ,तसेच शेकाप आ.जयंताभाई पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच येथील आघाडीच्या उमेदवारांना भरभर यश प्राप्त झाले असल्याचे बोलले जात आहे.तर निवडून आलेल्या आघाडीच्या सर उमेदवारांचे तळवली व चिल्हे ग्रामस्थांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.