तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीचे सरपंच ‘रविंद्र मरवडे’ यांनी आपला पदभार स्वीकारला

talavali
कोलाड (श्याम लोखंडे) : रोहा तालुक्यातील मौजे तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीची निवडणूक मागील डिसेंबर महिन्यात संपन्न झाली होती तर थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या येथील राष्ट्रवादीचे उमेदवार रविंद्र रामचंद्र मरवडे यांनी आज 2 जानेवारी रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारले तर उपसरपंच म्हणून प्रभाग क्रमांक एक चे राष्ट्रवादी, शेकाप, भाजप आघाडीचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार संदीप दत्तात्रेय महाडिक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड केली व त्यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला.
नवनिर्वाचित सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडिक यांनी पदभार स्वीकारले यावेळी सदस्य दयाराम मरवडे,हरिश्चंद्र मांगुलकर,सौ अनघा खांडेकर,सौ नीलम वाळंज,सुकेशनी महाडिक,तारामती पवार ,ग्राम सेवक मनोज जांभोरे ,तसेच माजी सरपंच वसंतराव मरवडे,राम मरवडे,मारुती खांडेकर,रामचंद्र मरवडे,रामचंद्र बामणे,शंकर मरवडे,खेळू मरवडे,नामदेव मरवडे,नंदू मरवडे,एकनाथ मरवडे ,गजानन बामणे,अनिल महाडिक, प्रमोद लोखंडे,विनायक शिंदे ,वासुदेव मरवडे,अनिल कोलटकर,पांडुरंग नागावकर,सह तळवली चिल्हे येथील आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. तर सरपंच व उपसरपंच यांनी पदभार स्वीकारले नंतर त्यांना व सर्व नवनिर्वाचित सदस्य यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
सत्तेच्या माध्यमातून गावचा विकास व्हावा या हेतूने येथील मतदार बंधू आणि भगिनींनी थेट सरपंच व उर्वरित सात जागेवरील सदस्य हे सर्वांगीण मताधिक्याने राष्ट्रवादी, शेकाप,भाजप, आघाडीवर विश्वास ठेवून निवडून दिले आहेत त्यामुळे आम्ही एकहाती निवडून आलो आहोत तुम्ही आमच्यावर टाकलेले विश्वास त्यामुळे आम्हा सर्वांना या खुर्चीवर बसण्याचा बहुमान प्राप्त झाले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या ग्राम पंचायत हद्दीतील सर्वांगीक गावच्या विकासासाठी आम्ही सैदव कटीबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रविंद्र मरवडे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *