कोलाड (श्याम लोखंडे ) : खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांच्या ग्लोबल मिशन ऑस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर च्या मार्गदर्शनाने व डॉ.प्रसाद खंडागळे यांच्या हेनकेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विशेष अर्थसहाय्याने जिल्हा परिषद स्तरावरील “अवकाश निरीक्षण केंद्राचे” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या “कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर जि. पुणे” येथे देशाच्या प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी येथील विद्यार्थी वर्गासाठी साकारलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रचा शुभारंभ खगोल शास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांच्या शुभहस्ते मोट्या उत्साहात संपन्न झाल्याने येथील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण खगोळाचे धडे मिळणार आहेत,
उत्स्फुर्त प्रतिसाद आणि उत्साह वातावरणात कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेगाव ढमढेरे येथे साकार करण्यात आलेल्या अवकाश निरीक्षण केंद्राचे शुभारंभ तसेच याच शाळेत शिक्षण घेतलेल्या “आद्यक्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे” यांच्या वर्गाचे नामकरण उद्घाटन सोहळा खगोल शास्त्रज्ञ विशाल कुंभारे,डॉ प्रसाद खंडागळे,लायन्सक्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री,माजी प्रांतपाल सी डी शेठ,प्रकाश नरके,शाळेचे मुख्याध्यापक अशोक राऊत,शिक्षक जयवंत भुजबळ, सह विविध मान्यवरांच्या व विद्यार्थी शिक्षक वर्गाच्या समवेत करण्यात आले .
सदरच्या या अवकाश निरीक्षण केंद्रामध्ये टेलिस्कोप, बायनोक्यूलर, निरीक्षणासाठी लागणारे सर्व फिल्टर्स, माहिती पुस्तिका तसेच इ-लायब्ररी, निरीक्षणासाठी उपयुक्त असे माहितीपट व सॉफ्टवेअर्स अश्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या असल्याने येथील विद्यार्थी वर्गाला पुरेपूर खगोलीयन माहितीचा शिक्षण या केंद्रातून मिळणार आहे.
अवकाश निरीक्षण केंद्राच्या संपूर्ण रूमला पोस्टर पेंटिंग केले आहे. त्यामध्ये सूर्यमाला, ताऱ्यांचा जीवनक्रम, आकाशगंगा,नेबूला, कृष्णविवर, तसेच असंख्य ताऱ्यांचे पोस्टर पेंटिंग केले असून या अवकाश निरीक्षण केंद्रातून विशाल कुंभारे यांनी टेलिस्कोप व इतर साधने कशी वापरायची, त्यातून अवकाश निरीक्षण कसे केले जाते अश्या सर्व मूलभूत गोष्टींचे संपूर्ण मार्गदर्शन प्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
या सर्व सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अवकाश निरीक्षण व संशोधनाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल व विद्यार्थी या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी खगोल वैज्ञानिक बनेल असा विश्वास खगोलशास्त्रज्ञ कुंभारे यांनी व्यक्त केला, आणि या अवकाश निरीक्षण केंद्राचा जवळपासचे विद्यार्थी, शाळा, महाविद्यालय तसेच इतर लोकांनाही त्याबद्दलचे ज्ञान प्राप्त होईल असे शेवटी कुंभारे यांनी सांगितले.