तळोजा परिसरातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

baban-patil1
पनवेल (संजय कदम) : तळोजा परिसरातील शेकडो तरुणांनी आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षप्रवेश केलेल्या तरुणांना पदांचे वाटप सुद्धा करण्यात आले.
तलोजा फेज वन-1 येतील तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर,शहर प्रमुख महेश भोईर,संपर्क प्रमुख मुरली म्हात्रे,महानगर संघटक बाळाराम मुंबईकर,विभाग प्रमुख गणेश म्हात्रे,विभाग प्रमुख मिथुन मढवी,युवासेना शहर अधिकारी तेजस पाटील,शाखा प्रमुख जगदीश मढवी, वासुदेव मढवी, कनैया मुंबईकर, सुनील मोरे, ज्ञानेश्वर भोईर, सारंग मढवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजप मधून गोमा भोईर व त्यांच्या सहकार्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *