PEN टाइम्स ऑनलाइन टीम : पैशाचे पाकीट मागच्या खिशात ठेवण्याची अनेकांना सवय असते. या पाकीटात पैशांसह क्रेडिट कार्ड, व्हिजिटींग कार्ड, लायसन्स, आयडी आदी ठेवल्याने त्याचा आकार चांगलाच फुगलेला असतो. असे पाकीट मागच्या खिशात ठेवल्याने अनेक शारीरीक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. यासंदर्भात अभ्यास करून सोसायटी फॉर अल्जायमर अॅन्ड एजिंग रिसर्चने सांगितलेले धोके आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत धोके : –
१ कमरेतील सायटीका ही नस जाड पाकीटामुळे दबली जाते. यामुळे हिप जॉईंट आणि कमरेच्या खाली दुखणे सुरु होते.
१ या दुखण्याला पिरीफोर्मिंस सिंड्रोम म्हटले जाते. मागच्या खिशात जाड पाकीट ठेवल्याने तुमचा पाश्र्वभाग एका बाजूला झुकला जातो. त्यामुळे पाठिच्या कण्यावर अधिक भार पडतो. कमरेच्या खालच्या भागाला बाक येतो. पाठिचा कणाही वाकडा होऊ शकतो.
२ आठ-आठ तास पाकीट खिशात ठेवून बसल्याने विद्यार्थ्यांमध्ये ही समस्या जास्त आढळते.
३ ही समस्या तरुण, वजन जास्त असलेले आणि जास्त वेळ बसणारांमध्ये आढळते. यावर वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे.
हे लक्षात ठेवा
१ मागच्या खिशात पाकीट ठेवून जास्त वेळ बसू नका.
२ हिप स्ट्रेचिंगचा व्यायाम करा.
३ थोडावेळ जागेवरुन उठून फिरून या.
४ बसताना पाकीट दुसरीकडे ठेवा.