दत्तजयंतीनिमित्त देउळवाडी येथे भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

annadan
उरण (विठ्ठल ममताबादे) : हिंदू धर्मात गुरु या तत्वाला विशेष महत्व असून गुरुंचे प्रतीक असलेल्या व करोडो हींदुचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत असलेल्या भगवान दत्तगुरु यांची जयंती महाराष्ट्रात सर्वत्र विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने,धार्मिक उपक्रमांनी साजरी केली जाते.उरणमध्येही दत्त जयंती निमित्त विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उरण शहरातील देऊळवाडी मधील प्रसिद्ध दत्त मंदिर जवळ असलेल्या शंकर मंदिर सभामंडप येथे देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुलाव, खीर, जिलेबी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
अन्न दान हे पवित्र दान आहे, अन्न दानाला सर्वात पवित्र व सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. उरण शहरा मधील देऊळवाडीतील प्रसिद्ध दत्त मंदिर येथे दरवर्षी देऊळवाडी युवक मंडळातर्फे दत्त जयंती निमित्त अन्नदानाचे आयोजन करण्यात येते. भाविक भक्तांची वाढती संख्या लक्षात घेवून देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि 7/12/2022 रोजी दुपारी 12:30 ते दुपारी 2:30 या वेळेत देऊळवाडीतील शंकर मंदिर येथील सभा मंडप येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी महा प्रसादाचा लाभ घेतला. उरण शहरात दत्त जयंती निमित्त दरवर्षी खूप मोठी यात्रा भरत असते. दूरदूरचे लोक ,जनता भाविक भक्तगण देव दर्शनासाठी,यात्रेसाठी उरण मध्ये येत असतात. भाविक भक्त गण यांना चांगल्या सेवा मिळाव्यात म्हणून देऊळवाडी युवक मंडळाचे तसेच देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी नेहमी झटत असतात. देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ व देऊळवाडी युवक मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव व महाशिवरात्रीला सुद्धा अन्नदान करण्यात येते. दत्त जयंती निमित्त केलेल्या अन्नदाना सारख्या समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
देऊळवाडी युवक मंडळाचे तसेच देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाचे निरंजन नार्वेकर, संतोष चव्हाण, प्रफुल्ल म्हात्रे,महेश झुजम,तुषार म्हात्रे, मंगेश म्हात्रे, योगेश शेलार, विपुल झूजम,सतीश पुजारी जतिन तवसाळकर, प्रवीण सुर्वे, प्रसाद म्हात्रे, विठ्ठल ममताबादे,रोमेश भुवड,भूषण म्हात्रे, आकाश जाधव,निशांत चव्हाण,आशिष न्यायी,साईनाथ ममताबादे,वेदांत नाईक,रोहन पटेल, चिराग पटेल,चित्तरंजन मुरुडकर, कमलाकर घरत आदी पदाधिकारी-सदस्य यावेळी उपस्थित होते. देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ व देऊळवाडी युवक मंडळाचे पदाधिकारी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *