दत्तावडी, कुर्डुस येथे विविध कार्यक्रमानी ‘श्री दत्त जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी

kurdus
अलिबाग : कुर्डुस पंचक्रोशीत नावा रूपाला आलेलं संत रोहिदास समाज उत्कर्ष मंडळाने या ही वर्षी श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला.
सकाळी श्री दत्त गुरूंना अभिषेक घालून दत्तजयंतीस सुरुवात झाली. त्यानंतर ११ वाजता श्री सत्य नारायण पूजा पार पडली.
kurdus1
दरम्यान, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये संगीत खुर्ची, चमचा गोटी, बटाटा शर्यत, स्मरण शक्ती, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये लहान मुलांपासून तरुण मुले, मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेऊन स्पर्धांचा आनंद घेतला. संध्याकाळी पालखी सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने लेझिम खेळण्यासाठी लहान मोठ्यांनी सहभाग नोंदवला.
रात्री सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता, त्यामध्ये देखील गावातील मुला, मुलींनी आप आपल्या पसंतीच्या गाण्यावर डान्स करत आपली कला सादर केली.
kurdus3
दुसऱ्या दिवशी मंडळाची वार्षिक जनरल सभा आयोजित करण्यात आली. त्यामधे मंदिर जीर्णोद्धार करण्याकरिता सर्वांनी देणगी देऊन हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले. केलेल्या आवाहनाला दाद देऊन सभेत १५,००,०००(पंधरा लाख) रुपयांची देणगी गोळा झाली म्हणून मंडळाच्या अध्यक्षांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले.
दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी घेतलेला सहभाग व विविध प्रकारच्या स्पर्धा यांचे बक्षीस वितरण करून सांगता करण्यात आली.
aapaa
हे मंडळ दरवर्षी सभोवतालच्या परिसरातील गुणवंतचा यथोचित सन्मान करतात. त्या वर्षी आपच्या पंचक्रोशीतील सांबरी गावचे सुपुत्र कु.स्वरूप सुदर्शन शेळके यानी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग लोणेरे येथील बाटू कॉलेज मध्ये ९९.७०% गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम याण्याचा मान पटकावला. असा हा गुणवान विद्यार्थी श्री पांडुरंग तुकाराम शेळके (गुरुजी) यांचा नातू असून त्याने आपल्या गावाचे, तालुक्याचे व रायगड जिल्ह्याचे उज्वल नाव महाराष्ट्राच्या पाटीवर कोरले अशा या सुपुत्राचे खूप गोड कौतुक मंडळाने केले.
त्याच बरोबर दत्तवाडी, कुर्डुसचे सुपुत्र श्री महेंद्र हरिश्चंद्र पुगांवकर यांची रायगड जिल्हा परिषद सहकारी कर्मचारी पतपेढी वर व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल मंडळाने श्री पांडुरंग शेळके(गुरुजी) यांच्या हस्ते सत्कार केला.
kurdus2
संत रोहिदास समाज उत्कर्ष मंडळ गेली पन्नास वर्षे उत्सव साजरा करत असून त्याबरोबर होळी, आंबेडकर जयंती ,गणेशोत्सव, दही हंडी (गोपाळकाला), नवरात्रौत्सव व असे सार्वजनिक उत्सव साजरे करते. त्याच बरोबर वृक्ष लागवड ,आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, स्वच्छ भारत अभियान असे विविध उपक्रम राबवत जातात.
kurdus4
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मंडळाचे कार्याध्यक्ष श्री अशोक पुगांवकर, दत्तवाडी अध्यक्ष श्री दिनेश नांदगावकर, मुंबई अध्यक्ष श्री नरेश नागोठकर मंडळाचे दोन्ही सचिव धर्मेंद्र पुगांवकर, गणेश श्रीवर्धनकर, मंडळाचे दोन्ही खजिनदार श्री पंकज पुगांवकर, निलेश पुगांवकर, हिशोब तपासनीस श्री महेंद्र पुगांवकर त्याच बरोबर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष श्री प्रवीण विनायक बेन्सेकर, सचिव व माजी अध्यक्ष श्री उमेश पुगांवकर, खजिनदार श्री सचिन नांदगावकर त्याच बरोबर इतर पदाधिकारी सदस्य श्री रमेश नांदगावकर,नारायण पुगांवकर, विजय बेन्सेकर, मनोज नांदगावकर, उमेश नांदगावकर, उपेश नांदगावकर,अमित नगोठकर, स्वप्नील पुगांवकर, पांडुरंग पुगांवकर,राजेंद्र झिराडकर, साहिल पुगांवकर, कल्पेश पुगांवकर,रंगनाथ पुगांवकर, रंजीत पुगांवकर, शशिकांत नांदगावकर, संदीप पुगांवकर, सचिन पुगांवकर, प्रज्वल नांदगावकर, चेतन नांदगावकर, समीर नांदगावकर, प्रदीप बेन्सेकर, किशोर बेलापुरकर,सुरेश नांदगावकर, श्रृती पुगांवकर, प्रांजल नांदगावकर, अंकिता पुगांवकर,हर्षदा झिराडकर, भार्गवी नांदगावकर, पूर्वा नांदगावकर व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी हातभार लावून कार्यक्रम यशस्वी पार पडला. ह्या कार्यक्रमाला ज्यांचे ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे मंडळाने आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *