दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपये किमतीचा ऐवज केला लंपास

chor
पनवेल (संजय कदम) : एका बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
खारघर सेक्टर ३ येथे राहणाऱ्या जयश्री धराडे यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्याचा काडी कोयंडा तोडून आत मध्ये असलेले १ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *