उरण : सारडे विकास मंच आणि केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था वेश्वी यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील गावातील दहावी व बारावीच्या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्याचा कार्यक्रम अलिकडेच पार पडला.
सारडे गावातील दहावी बोर्डाच्या शालांत परीक्षेत उज्वल यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील बारावी बोर्डाच्या आर्ट,कॉमर्स आणि सायन्स शाखेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना तसेच सुयश क्लासेस आवरेच्या यशस्वी विद्यार्थ्यां सोबतच जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरेच्या दहावी बोर्डाच्या शालांत परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांनां त्यांच्या आयुष्यात पुढील शैक्षणिक कारकिर्दीत उत्तुंग भरारी घेण्याकरिता व पंखात नवं बळ यावं या उदात्त हेतूनं त्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देत सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि भेट वस्तू प्रदान करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आलं सोबतच ह्या विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन करणार्या गुरुजन आणि पालक वर्गाचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील कार्याध्यक्ष रोहित पाटील, कांतीलाल म्हात्रे यांचे योगदान मिळाले. सर्व सहकारी मंडळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.