कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यात नेरळ जवळ असलेली दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षे होती पण या निवडणूक नागरिकांनी अमर मिसाळ यांना संधी दिली आहे.
२०२२ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत कर्जत तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची व सर्वाच लक्षवेधी ठरलेली ग्रामपंचायत म्हणून दहिवली तर्फे वरेडी या ग्रामपंचायतीची लढत हि अत्यंत प्रतिष्ठेची झालेली पाहायला मिळाली त्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी आपले राजकीय ताकदीने सिद्ध केली व विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे करून दहिवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतीवर आखिर भगवा फडकवत थेट सरंपचपदी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सौ.मेघा अमर मिसाळ ह्या विराजमान करून सत्तांतर घडवून मोठे आव्हान देऊन विजय संपादन करून दाखवले आणि व सरपंच पदी ग्रामविकास आघाडीचे आदेश एकनाथ धुळे यांना विराजमान करत महाविकास आघाडीला मोठे धक्का दिला ग्रामविकास आघाडीने बाजी मारली आहे.
2 जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त दहिवली ग्रामपंचायतचे उपसरपंच पदाचे निवडणुकीत पार पाडली असून पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतीवर यावेळी माझी सभापती अमर मिसाल यांनी राष्ट्रवादीची सत्ता उधळून लावून शिंदे गटाचा झेंडा ग्रामपंचायत वर फडकवला आहे दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ मेघा अमर मिसाल यांनी कारभार स्वीकारल्या असून उपसरपंचपदी ग्राम विकास आघाडीचे आदेश धुळे या निवडून आले आहेत.
मागील पंधरा वर्षाची कारकीर्द पाहता या ठिकाणी विकास कामांच्या माध्यमातून बदल घडविण्यासाठी जनतेने परिवर्तन घडवून आणले आहे त्यामुळे येत्या पुढील काळात या ग्रामपंचायत मधील संपूर्ण क्षेत्रात विकास कामांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या एकमताने परिवर्तन घडवून आणणार