पेण (राजेश प्रधान) पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या श्यामकांत पाटील, प्रसाद पाटील व दत्ता साळवी या 3 हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर पोलीस नाईक मनीष म्हात्रे यांना हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संवर्गातील पदांना मान्यता दिली आहे. गृह विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक रायगड यांनी सुरुवात केली आहे.
पोलीस दलात 30 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्यामकांत पाटील (1331), प्रसाद पाटील (1907), दत्ता साळवी (1900) या तीन हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली असून 15 वर्ष सेवा पूर्ण करणारे पोलीस नाईक मनीष म्हात्रे (1220) यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
दादर सागरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, के.आर.भऊड, चव्हाण, कोकरे, मुंडे, खाडे, सारिका पाटील आदींनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.