अलिबाग : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 27 हजार 573 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर काल 757 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 956, पनवेल ग्रामीण-753, उरण-253, खालापूर-282, कर्जत-240, पेण-499, अलिबाग-927, मुरुड-63, माणगाव-264, तळा-48, रोहा-388, सुधागड-91, श्रीवर्धन-52, म्हसळा-20, महाड-220, पोलादपूर-42 अशी एकूण 6 हजार 098 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-11 हजार 827, पनवेल ग्रामीण-3 हजार 539, उरण-1 हजार 253, खालापूर-1 हजार 692, कर्जत-865, पेण-2 हजार 144, अलिबाग-2 हजार 131, मुरुड-215, माणगाव-871, तळा-43, रोहा-1 हजार 250, सुधागड-202, श्रीवर्धन-213, म्हसळा-220, महाड-944, पोलादपूर-204 अशी एकूण 27 हजार 573 आहे.
काल दिवसभरातही पनवेल मनपा-110, पनवेल ग्रामीण-68, उरण-7, खालापूर-37, कर्जत-36, पेण-72, अलिबाग-76, मुरुड;3, माणगाव-23, रोहा-13, सुधागड-20, महाड-42, पोलादपूर-16 असे एकूण 523 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-328, पनवेल ग्रामीण-81, उरण-74, खालापूर-83, कर्जत-46, पेण-72, अलिबाग-71, मुरुड-21, माणगाव-22, तळा-4, रोहा-43, सुधागाड-16, श्रीवर्धन-17, म्हसळा-9, महाड-49, पोलादपूर-13 असे एकूण 949 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
काल दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-244, पनवेल ग्रामीण-97, उरण-21, खालापूर-32, कर्जत-34, पेण-67, अलिबाग-104, मुरुड-23, माणगाव-37, रोहा-58, सुधागाड-7, श्रीवर्धन-4, म्हसळा-4, महाड-8, पोलादपूर-17 असे एकूण 757 ने वाढ झाली आहे.
कालच्या दिवसात 20 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-7, उरण-2, खालापूर-3, कर्जत-1, पेण-1, अलिबाग-2, रोहा-4) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 19 हजार 555 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 309 आहे.