दिव्या नायक हिचे फुटबॉल टूर्नामेंट स्पर्धेत सुयश !

divyaa
उरण (विठ्ठल ममताबादे) : दि.३०/११/२०२२ खेलो इंडिया अंडर १७ मुलींचा रायगड डिस्ट्रिक्ट टीम ने पहिल्यांदा WIFA अंतर्गत मुलींचा फुटबॉल टूर्नामेंट मध्ये सहभागी होऊन दुसरा नंबर पटकविला.
सदर स्पर्धा कुपरेज ग्राउंड, कुलाबा, मुंबई येथे संपन्न झाली. वेस्टर्न इंडिया फूडबॉल असोसिएशन(WIFA) चे उपाध्यक्ष व मुंबई डिस्ट्रिक्ट फूडबॉल असोसिएशन (MDFA) चे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ह्या मुलींना गौरविण्यात आले. त्यांनी ह्या मुलींना योग्य मार्गदर्शन मिळाल्या मुळे यश गाठण्याचे संकेत दिले व पुढील वाटचाली साठी भरभरून शुभेच्छा ही दिल्या.
मुलींचा ह्या अद्वितीय कामगिरी मध्ये मिड्फिल्डर् ह्या पोसिशन वर खेळणारी उरण ची सुकन्या दिव्या दुर्गादास नायक हिची महत्वाची कामगिरी आहे. फुटबॉल क्षेत्रात तिचे पदार्पण तिचा वयाच्या १०व्या वर्षी सेवेन स्टार फुटबॉल अकॅडमी उरण मार्फत झाले व तेथून दिव्याने फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
“तिचे खेळाबद्दल चे प्रेम आणी उत्साही वृत्ती हिच तिचा यशाची गुरुकिल्ली सिद्ध होणार आहे” असे तिचे फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे यांनी सांगितले. दिव्याचे स्वप्न फुटबॉल जगतात वाटचाल करणे आहे.त्याही पलीकडे तिला इंडिया साठी खेळण्याची खूप मोठी इच्छा आहे. असे तिचे वडील दुर्गादास नायक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *