‘दिशा सालियानच्या आईने सांगितले’ : माझ्या एकुलत्या एक मुलीची प्रतिमा खराब करू नका

मुंबई : सुशांतच्या आत्महत्येआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियानने ९ जून रोजी आत्महत्या केली होती.  दोन्ही प्रकरणे आत्ता एकमेकांना जोडली जात आहेत. अनेक कान्नी  या दोन्ही प्रकरणाची लिंक जोडली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

दिशाचे पालक म्हणाले की, माझ्या मुलीला बदनाम करू नका . ती आमची एकमेव मुलगी आहे. आता सर्व  जण तिची प्रतिमा पुर्णपणे खराब करत आहेत. हे सार्वजण   आम्हाला अशाप्रकारे त्रास देऊन मारू इच्छित आहेत. भारतातील लोकांना, सर्व मीडिया, सोशल मीडिया, युट्यूब आणि अन्य सर्वांना सांगू इच्छिते की हे सर्वकाही खोटे आहे. सर्व बातम्या बनावटी आणि केवळ अफवाह आहेत.

दिशासोबत बलात्कार आणि हत्येच्या थेअरीला देखील त्यांना चुकीचे म्हणत हे सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. सोबतच पोलीस आपले काम योग्यरित्या करत असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी सांगितले की, राजकीय नेते ज्या लोकांची नावे घेत आहेत, त्यांचा माझ्या मुलीशी काहीही संबंध नव्हता. ती त्यांना भेटली देखील नाही व त्यांचा नंबर देखील नव्हता. त्यांच्यासोबत एक फोटो देखील नाही. तरी देखील तिला या प्रकरणात ओढले जात आहे. आम्ही या लोकांविरोधात तक्रार दाखल करू शकतो, मात्र आम्ही करणार नाही. पार्टीबाबत जे आरोप आहेत ते देखील खोटे आहेत.