कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी या गावचे सुपुत्र दिनेश अनंत येरुणकर यांची गुरुवार दि.१८ फेब्रुवारी २०२१ रोजी दि. आण्णासाहेब सावंत को. ऑप. अर्बन बँक महाडच्या प्रभारी मुख्यअधिकारी अधिकारी या पदावर नेमणूक झाली असून नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनेश अनंत येरुणकर हे दि. आण्णासाहेब सावंत को.ऑप.अर्बन बँक महाड या बँकेत १९८६-८७ पासुन कार्यरत असुन ते उप महाव्यवस्थापक (डेप्युटी मॅनेजर )या पदावर कार्यरत असतांनाच तसेच त्यांचा पूर्वरत कामांचा विचार करत पुन्हा त्यांना गुरुवार दि.१८ फेब्रुवारी २०२१ रोजी दि.आण्णासाहेब सावंत को.ऑप अर्बन बँक महाडच्या प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी या पदावर बढती मिळाली आहे.
दिनेश येरुणकर यांना मिळालेल्या बढती बद्दल त्यांचे संजय वायकर(अँसि.जनरल मॅनेजर ), राजेंद्र गायकवाड (अँसि.जनरल मॅनेजर),विश्वजीत सावंत (मॅनेजर )राजेंद्र सकपाळ (मॅनेजर ),सालेकर तसेच बँकेचे सर्व कर्मचारी,त्यांचे बंधु तथा कोलाड हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य शिरीष येरुणकर सर, अविनाश माळी सर तसेच चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामस्थ महिला व युवक वर्ग व कोलाड आंबेवाडी वरसगाव परिसरातील विविध स्तरावरील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांकना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व सदिच्छा वर्षाव होत आहे .