दुबईहून केरळला येणार्‍या विमानाला मोठा अपघात; पायलटसह 17 ठार, एक मृत पायलट महाराष्ट्राचा सुपूत्र

कोझिकोड : केरळातील कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. हे विमान धावपट्टीवरून घसरले आहे. या अपघातात विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. नुकत्याच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, कोझिकोड विमान अपघातात 2 पायलटसह 17 जण ठार झाले आहेत. 123 जण जखमी आहेत तर 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती मलापुरमच्या अधीक्षकांनी दिली.

अपघातग्रस्त आय एक्स 1344 विमानात 191 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आले होते. ’वंदे भारत मिशन’च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होते. कोझिकोड येथे धावपट्टीवर उतरत असताना विमानाला अपघात झाला. विमान लँड होत असताना धावपट्टीपासून काही अंतरावर ते घसरले. कोझिकोडमध्ये गेले 24 तास प्रचंड पाऊस पडतो आहे. या पावसामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या भयंकर अपघातात 2 वैमानिकासह 15 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. तर 123 जण जखमी झाले आहेत. अपघातात जीव गमावलेले पायलट दीपक वसंत साठे हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. ते NDA मध्ये कार्यरत होते. NDRF च्या टीम विमानतळाकडे रवाना झाल्या आहेत. शेकडो अँब्युलन्सही अपघातस्थळी आहेत