देशातील एकूण कोविड चाचण्या 1.77 कोटींच्या पुढे

नवी दिल्ली : देशात मागील 24 तासांत 4 लाख 8 हजार 855 कोरोना टेस्ट लॅबमध्ये करण्यात आल्या, यामुळे प्रतिदशलक्ष लोकांमागे टेस्टची संख्या वाढून आता 12 हजार 858 झाली आहे आणि एकूण टेस्टची संख्या 1 कोटी 77 लाखांच्या पुढे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 संक्रमण आणि भारतात तंबाखूचा वापर हे प्रकाशन प्रस्तुत केले आहे.

देशातील 1,316 लॅबसह टेस्ट लॅबचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे. सध्या 906 सरकारी लॅब आणि 410 खासगी लॅब कार्यरत आहेत. या मध्ये रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित टेस्ट लॅब 675, ट्रू नॅट आधारित टेस्ट लॅब 537, सीबीएनएएटी आधारित टेस्ट लॅब 104 आहेत.