पनवेल (संजय कदम) : तालुक्यातील पेटाली गाव परिसरात देशी विदेशी मद्य साठा करून त्याची विक्री करणाऱ्या एका महिलेविरोधात तळोजा पोलिसांनी कारवाई करून तिच्याकडून १०,३८० रुपये किमतीचा मद्य साठा हस्तगत केला आहे.
पेटाली गाव सेक्टर ५ परिसरात एक महिला तिच्या जवळ देशी विदेशी दारूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांना मिळताच विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास १०,३८० रुपये किमतीच्या देशी – विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करून तिच्याविरोधात कारवाई केली आहे.