द्रोणगिरीचा ऑक्सिजन आईइन्फ्रा – सिने अभिनेता विजय पाटकर

vijay-patkar
उरण (विठ्ठल ममताबादे) : सध्याच्या महागाईच्या काळात घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना घर विकत घेणे परवडत नाही, या सर्वाना पर्याय म्हणून स्वस्त दारात सामान्य नागरिकांना परवडणारे घर आता विकत घेता येईल ते हि आई इन्फ्रा मुळेच.
नवी मुंबईच्या द्रोणागिरी या भागात आई इन्फ्रा कंपनी नागरिकांना स्वस्त घरे देत आहे एवढंच न्हवे तर घरघेताना कर्जाची तरतूद सोप्या पद्धतीने कसे होईल याची देखील काळजी आई इन्फ्रा घेत आहे. आता पर्यंत ५०० च्या वर घरे नागरिकांना दिली आहेत. आणि आत आई इन्फ्रा कंपनीने एक पाऊल पुढे टाकले असून नक्कीच आई इन्फ्रा उत्तरोत्तर प्रगती करेल यात शंकाच नाही असे गौरवोदगार दिग्दर्शक विजय पाटकर यांनी काढले.
द्रोणगिरीच्या सेक्टर १५ मध्ये प्लॉट क्रमांक १२२ येथे साई शिल्प या सातमजली इमारतीचे भूमी पूजन सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विजय पाटकर यांनी जनतेशी संवाद साधला. सवांद साधताना ते म्हणाले कि आज पर्यंत साई इन्फ्रा ऐकले आहे. आई इन्फ्रा हे प्रथमच ऐकतो आहे. स्व:कष्टाने नरसू पाटील यांनी आईच्या नावाने स्थापन केलेली आई इन्फ्रा कंपनी कधीच अपयशी ठरणार नाही.
आत्ता पर्यंत ५०० च्या वर कुटुंबाना घरे देऊन जो विश्वास आई इन्फ्राने मिळवला आहे. तोच विश्वास पुढे कायम ठेऊन आई इन्फ्राच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक करा आणि हक्काचे घर मिळावा असे अवाहन विजय पाटकर यांनी केले.
या सोहळ्या प्रसंगी सिने अभिनेते जयवंत भालेकर, फुंडे गावचे सरपंच सागर घरत,आई इन्फ्राचे सर्वेसर्वा नरसू पाटील, ब्रह्मानंद पाटील, मिलिंद ठाकूर, नितीन गुप्ता, विशाल सावंत, रमाकांत गावंड, जासई गावचे सरपंच संतोष घरत, किरण घरत, श्रद्धा हेगडे, चिमाजी पाटील, वेश्वी गावचे सरपंच विलास पाटील, विश्वजित घरत, सतीशशेठ गुप्ता, शेखर पाटील आदी मान्यवरांसह द्रोणागिरीतील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यात सामान्य नागरिकांना घरे देनारी भारतातील एकमेव कंपनी म्हणजे आई इन्फ्रा आहे अशा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.
———————————-
सामान्य नागरिकांचा आश्रय दाता म्हणजे नरसू पाटील.नक्कीच नरसु पाटील आयुष्यात पुढे प्रगती करतील यात वाद नाही.
— सिने अभिनेता विजय पाटकर
———————————-
मध्यम वर्गीयांना स्व:स्तात घरे देणारी आई इन्फ्रा एकमेव कंपनी आहे. त्याचा अनुभव आम्ही डोळ्याने बघितले.
—-सिने अभिनेता जयवंत भालेकर
———————————-
द्रोणगिरीचे खरे विकासक आई इन्फ्राचे सर्वेसर्वा नरसू पाटील हेच आहेत. सर्वसामान्य लोकांना त्यांनी घरे उपलब्ध करून दिली आहेत.
—सागर घरत – सरपंच फुंडे ग्रामपंचायत
———————————-
उरण नगरीचा कायापालट करणारी कंपनी आई इन्फ्रा कंपनी आहे. जनतेचा उत्तम विश्वास आई इन्फ्रा ने संपादित केला आहे.
—-संतोष घरत – सरपंच जासई ग्रामपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *