पालघर : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील माहीम येथे घडली आहे.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आठ तरुणांना सातपाटी पोलिसांनी अटक केली आहे. हे दुष्कृत्य पीडित मुलीच्या मित्राने घडवून आणला असल्याचे समोर आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.
पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील पाणेरीनजीक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका निर्जनस्थळी नेले. त्यानंतर आठजणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. मित्रानेच घडवून आणलेल्या या अत्याचारानंतर पीडित मुलीने माहीम पोलीस ठाणे गाठले. तिने झाल्या प्रसंगाची पोलिसांना माहिती देत आठ जणांविरोधात तक्रार नोंदवली. सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुरक्षेत्रात माहीम परिसर येतो. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related