सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “नकार”

“ज्योती… आज हे काम तू कर ना.. मला बाहेर जायचंय.. आणि बॉसला ही फाईल आजच हवी आहे… प्लीज कर ना… “
“अगं पण…”
“प्लीज प्लीज प्लीज… फाईल कंप्लीट नसेल तर बॉस मला परत सोडणार नाही गं…प्लीज कर ना..”
“ठीक आहे.. करते..”
“थैंक्यू.. तू किती चांगली आहेस…! आणि हो… बॉस नी विचारलं तर सांग, मी माझं काम पूर्ण करून फाईल तुझ्या कडे देऊन गेले.. ओक्के? आणि आजच्या पार्टी वरुन परत येताना तुझ्या साठी उद्या काही तरी घेऊन येईन.”

ज्योतीला काम सांगून रेवा पार्टी एंजॉय करायला निघुन गेली.. आणि ज्योती… ती बसली फाईल मधे डोकं खुपसुन… रेवाचं काम आणि स्वतः चं काम.. दोन्ही करता करता आज तिला ऑफिस मधुन निघायला उशीर झाला..
तिच्या मुलाला तिला शाळेतुन आज घरी न्यायचं होतं.. आज रिक्षावाले काका सुट्टी वर होते. आणि ज्योतीचा नवरा दिलीप, तो ही कामा निमित्त बाहेर गावी गेला होता.. म्हणून पूर्ण जबाबदारी ज्योती ची होती…

पण रेवाच्या कामामुळे ज्योतीला तिच्या मुलाला – चिंटूला – शाळेतुन पिक अप नाही करता आले…
चिंटू दूसरी रिक्षा करून घरी आला होता. आणि उशीरा आलेल्या आईला बघून चिंटू रुसुन बसला होता. आणि आईला एक नकार देता आला नाही.. म्हणून आई कामात अडकुन पडली होती..

तशीच अवस्था राजेशची! त्याचे बिजनेस पार्टनर्स त्याच्यावर अशी च कामाची ओझी टाकून स्वतः घरी निघुन जायचे…

सीमाची ही अशीच अवस्था… घरच्या प्रत्येकाच्या एक्स्ट्रा डिमांड पूर्ण करता करता तिला स्वतः साठी, स्वतः च्या बिजनेस साठी वेळच मिळत नव्हता.. म्हणून तिला तिचा बिजनेस बंद करावा लागला..

ह्या सगळ्यांची अवस्था अशी झाली.. त्याला कारण म्हणजे – त्यांना कधी कोणाला नकार नाही देता आला.. जर त्यांनी वेळीच समोरच्या व्यक्तीला प्रेमाने, समजावून सांगून जर नकार दिला असता.. तर त्यांना स्वतः च्या लाईफ मधे कधी एडजस्टमेंट करावी लागली नसती…

आपल्याही बाबतीत कित्येकदा असे घडते.. कधी जॉब मधे बॉस नाराज होऊ नये म्हणून.. तर कधी लग्ना नंतर सासरचे नाराज होऊ नये म्हणून.. एक सुन किंवा जावई म्हणून.. कधी नवरा-बायको, मित्र – मैत्रीण, सोबत काम करणारे कलीग म्हणून.. तर कधी अगदी आई वडील म्हणून.. आपण पावलो पावली काही ना काही एडजस्टमेंट करत राहतो..
कधी तरी ठीक आहे.. असं म्हणून नेहमीच स्वतः ला समजवत राहतो..
पण फक्त एकदा हिंमत करून जर आपण समोरच्याला आपली परिस्थिती, आपली मानसिकता.. आपली बाजू प्रेमाने समजवली.. तर अनेक गोष्टी सुखकर होतील..

आपल्या एखाद्या निर्णयाने समोरच्याला काही वेळा पूरती नाराजी वाटू शकते.. पण.. थोड्या दिवसांनी सगळे आपल्याला समजून घेतात.. त्यामुळे थोडी हिंमत करून एखादी गोष्ट जर आपल्याला जमत नसेल तर समोरच्या व्यक्तीला तसे नम्रतेने सांगितले तर रिलेशन आणि आपली इमेज दोन्ही चांगले राहते..
गरज असते ती फक्त कोणत्या गोष्टीला कधी नकार द्यायचा हे आपलं आपण ठरवण्याची..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *