नगरपंचायत कार्यालयात हुतात्मा वीर भाई कोतवाल पुण्यतिथी साजरी

mangav-nabhik
माणगांव (रविंद्र कुवेसकर) : हुतात्मा वीर भाई कोतवाल पुण्यतिथी निमीत्त माणगांव शहरातील नाभिक समाजाच्या तरुण मित्र मंडळाने नगरपंचायत कार्यालयात एकत्र येऊन नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या शुभहस्ते हुतात्मा विर कोतवाल यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पीत, दीपप्रज्वलन करुन त्यांची पुण्यतिथी साजरी केली.
आपली संस्कृती, आपले आदर्श, महान व्यक्तीमत्व यांचे दिशादर्शक कार्य त्यांचे विचार, शिकवण, आदर्श यांचे आचरण महत्वाचे असुन अशा प्रकारे पुण्यतिथी साजरी करुन नाभिक समाजाचे तरुण एक चांगले कार्य करीत आहेत. अलिकडे दुर्दैवाने पाश्चिमात्य संस्कृतीचे स्तोम आहे. थर्टीफर्स्ट, बर्थडेच्या साजरीकरनात आपली संस्कृती, आदर्श आपण विसरत आहोत. अशाप्रकारे समाजातील आदर्शवत व्यक्तींचे स्मरण करुन पुण्यतिथी साजरी करणे ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे मनोगत नगराध्यक्षांनी व्यक्त केले. रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ विश्वस्त भाऊ पांडे, संजय पालांडे गुरुजी, यांनी आपले समयोचित विचार मांडले.
याप्रसंगी नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जाधव, तालुका अध्यक्ष सौरभ पांडे, माणगांव सलून संघटना अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष राहुल मोरे, कार्याध्यक्ष अभिषेक खंडागळे, समाज बांधव समीर मोहिते, मंगेश बडे, नितीन शिंदे, आशिष जाधव, शैलेश पवार, प्रदीप कदम, सुहास शिंदे, सुरेश हुजरे, दीपेश जाधव, अमोल जाधव, महेश कदम, प्रवीण शिंदे, दीपक मोहिते, सतीश चव्हाण, दिनेश जाधव, महेंद्र जाधव हे समाज बांधव व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारीवृंद देखिल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *