नववर्षाचे स्वागत करतांना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या – पोलीस उपायुक्त पंकज डहाणे

dahane
पनवेल (संजय कदम) : नववर्षाचे स्वागत करतांना सर्व नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन परिमंडळ – २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण पनवेल परिसरातील हॉटेल, ढाबे , फार्महाऊस, खासगी बंगल्यांना पार्टीच्या आयोजनासाठी पसंती देत आहेत. तालुक्यातील अनेक फार्महाऊस आणि बंगले बुक करण्यात आली आहे. परंतु या सर्व घडामोडींवर करडी नजर पोलिसांची आहे.
उत्साहात कोणताही नियमबाह्य तसेच अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिला असून ठीक ठिकाणी नाका बंदी, ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस केल्या जाणार आहेत. अमली पदार्थाची वाहतूक व सेवन करणे या विरोधात सुद्धा कारवाई केली जाणार आहे. तरी प्रत्येकाने काळजी घेऊन कायद्याचे उल्लंघन न करता सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *