पनवेल (संजय कदम) : नववर्ष स्वागताच्या निमित्ताने व मंदिराच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल मध्ये आज श्री भगवती साई संस्थान च्या वतीने पालखी सोहळा पार पडला यावेळी शेकडो साई भक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते.
ही पालखी मिरवणूक आज सकाळी श्री साईबाबा मंदिरातून काढण्यात आली त्यानंतर पनवेल रेल्वे स्थानक, पनवेल बस स्थानक, लाईन आळी, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा, सोसायटी मार्गे पुन्हा श्री साईबाबा मंदिर अशी वाजत गाजत ओम साई च्या गजरात काढण्यात आली.
या मिरवणुकीत श्री साईबाबाचे तसेच श्री साईबाबा नारायण चे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .