पनवेल (संजय कदम) : नवीन व जुन्या कोर्टातील प्रलंबित प्रश्नांसंबंधात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणार असे सलग तिसऱ्यांदा पनवेल बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी विजयी झालेले अॅड. मनोज भुजबळ यांनी आपल्या विजयानंतर मत व्यक्त केले.
पनवेल बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक बुधवारी संपन्न झाली या निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा जाहीर झाला या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान झाल्याने निवडूक अत्यंत चुरशीची बनली होती. या निवडणुकीत ९९७ मतदार संख्या होती त्यामुळे या निवडणुकीसाठी नवीन कोर्ट इमारत येथे या मतदानासाठी मतदान केंद्र उभारण्यात आले. या निवडणुकीत माजी अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ पुन्हा तिसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी रिंगणात उभे असल्याने हि निवडणूक चुरशीची झाली होती.
या निवडणुकीत अॅड. मनोज भुजबळ यांच्या पॅनेलने ११ उमेदवार उभे केले होते. यापैकी अॅड. सुशांत घरत हे बिनविरोध निवडून आले होते. मतदानाच्या वेळी पहिल्या फेरी पासूनच अॅड. मनोज भुजबळ आघाडीवर होते व ते भरघोस मताने विजयी झाले तसेच सचिव पदासाठी अॅड. प्रल्हाद खोपकर हे चौथ्यांदा उभे राहिले होते ते सुद्धा विजयी झाले त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी अॅड. संदीप जगे, सहसचिव पदासाठी अॅड. सीमा भोईर, खजिनदार पदासाठी अॅड. धनराज तोकडे, तर सदस्यपदासाठी अॅड. प्रगती माळी, अमित पाटील, भूषण म्हात्रे हे विजयी ठरले आहेत.
या विजयासंदर्भात बोलताना अॅड. मनोज भुजबळ यांनी सांगितले कि बेंच आणि बार यांच्यातील सलोख्याचे संबंध राहतील यासाठी प्रयन्त करणार नवीन कोर्टासाठी लायब्ररी, कँटीन आदी प्रश्नांसह जुन्या कोर्टातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू व सर्वांना एकत्रित घेऊन काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीचे कामकाज मुख्यनिवडणूक अधिकारी म्हणून अॅड. एच. जे. शेळके यांनी पहिले त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. शशिकांत म्हात्रे, अॅड. राजेश पाटील, अॅड. जगदीश ठाकूर, अॅड. राजेश खंडागळे, अॅड. विकी दुसिंग, अॅड. दक्षता पूनकर, अॅड. त्रिवेणी भगत, अॅड. सोमनाथ पाटील, अॅड. कल्पेश कांबळे, अॅड. संदीप मुंडकर, ऍअॅड. ज्ञानेश्वर पाटील, अॅड. नितीन पाटील, अॅड. प्रणित मालगुडकर यांनी कामकाज पाहिले.