मुंबई : नव्या वर्षात सोनं आणि चांदी च्या दरात चांगलीच वाढ होतांना दिसत आहे. वायदे बाजारात आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
बुधवार 4 जानेवारी रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव आज 0.36 टक्क्यांनी वधारला आहे.
चांदीच्या दरात आज 0.29 टक्के वाढ झाली आहे.
याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.67 टक्क्यांनी वधारुन बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीचा दर 0.50 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. सोन्याचा भाव सध्या 30 महिन्यांच्या उच्चांकावर असून लवकरच त्याची विक्रमी किंमत गाठता येईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदीचे भाव तेजीत आहेत. सोन्याचा भाव आज 0.90 टक्क्यांनी वाढून 1,845.64 डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे किलोमागे दर वाढले आहेत. त्यामुळे चांदीलाही अच्छे दिन आले आहेत.
ऐन लग्नसराईत सोन वाढत असल्याने सोन्याची खरेदी करण्याऱ्यांसाठी चिंता निर्माण झाली आहे. बुधवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव (सोन्याचा दर आज) 55,728 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता, जो कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत रात्री 9:25 पर्यंत 198 रुपयांनी वधारला होता. सोन्याचा भाव आज 55,650 रुपयांवर खुला होता. याआधी 368 रुपयांनी वधारून एमसीएक्सवर 55,470 रुपयांवर बंद झाला होता.
वर्ष | 24 कॅरेट सोन्याचे दर |
10 दिवस | 54,860 |
3 महिने | 54,507 |
1 वर्ष | 51,686 |
2 वर्ष | 49,478 |
3 वर्ष | 48,717 |
4 वर्ष | 45,824 |
5 वर्ष | 43,359 |
चांदीचे दर प्रतिकिलो – 68,540 मुंबईतील सोन्याचे दर
सोन्याचे दर |
1 ग्रॅम दर |
10 ग्रॅम दर |
24 कॅरेट |
5,558 |
55,580 |
22 कॅरेट |
5,095 |
50,950 |