नागसावंतवाडी हितवर्धक मंडळाच्या वतीने दिनदर्शिका-२०२३ लोकार्पण सोहळा संपन्न

gudhekar6
मुंबई (शांताराम गुडेकर) : नागसावंतवाडी हितवर्धक मंडळ कासार्डे (रजिस्टर) मुंबई यांच्या वतीने दिनदर्शिका -२०२३,लोकार्पण सोहळा नुकताच, श्रमिक ज्येष्ठ नागरिक संघ, ना.म.जोशी मार्ग, येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याला राष्ट्रीय खेळाडू व समाज सेवक -अजय पेंडूरकर,समाजसेवक- भाई शेट्ये,समाजसेविका-धनश्री केळशीकर, वस्त्रहरण मालवणी नाटक फेम-विलास पाटील, शिवसेना सांगली जिल्हा संपर्क प्रमुख- छाया कोळी यांच्या हस्ते दिनदर्शिका-२०२३ व भजनी टाळ लोकार्पण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.
मान्यवरांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. तसेच मंडळाचे अध्यक्ष- धर्माजी वंजारे सह विजय वंजारे,अतुल सावंत, रमेश सावंत, राजेंद्र वंजारे,श्रीकृष्ण सावंत आदी पदाधिकारी यांनी फारच मेहनत घेतली होती.
या सोहळ्यास नागसावंतवाडी हितवर्धक मंडळाचे सभासद,स्थानिक सामाजिक संस्थानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *