नागोठणे ग्रामपंचायती कडून जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासह शालेय साहित्य वाटप

नागोठणे (महेश पवार) : कोरोना महामारीमुळे पालकवर्ग बेजार झाल्याची नागोठणे ग्रामपंचायतीने दखल घेऊन हद्दीतील रायगड जिल्हापरिषदेच्या सहा  शाळांमधील एकूण २४१ विध्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश, दफ्तर, स्कुल बॅग, कंपास पेटी, छत्री, पाणी बाटली आदी शालेय साहित्य वाटप करून पालकवर्गाला दिलासा दिला.
 नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील राजिपच्या प्राथमिक उर्दू शाळेतील ९२ विद्यार्थी, कचेरी शाळेतील ३७ विद्यार्थी, कन्या शाळेतील ३४ विद्यार्थी, जोगेश्वरी नगर शाळेतील १८ विद्यार्थी, मिरानगर येथील शाळेतील ३७ विद्यार्थी, मुरावाडी  येथील शाळेतील २३ विद्यार्थॊ आदी ६ शाळेतील विद्यार्थ्यांना  नागोठणे ग्रामपंचायती कडून प्रत्येकास दोन गणवेशासह शालेय  साहित्य वाटप केले. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी राजिपच्या प्राथमिक उर्दू शाळेतील ९६ विद्यार्थ्यांना गणवेशासह शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी स्थानिक शाळा समिती अध्यक्ष मुजफ्फर कडवेकर, माजी अध्यक्ष मन्सूर (मन्नू )मुजावर, उपाध्यक्ष शबिना रिफाई, सदस्य वासिम बोडेरे, सदस्या शबिना असिफ मुल्ला, रिहाना कुंभार्लीकर आदींसह शाळेच्या मुख्याध्यापिका फातिमा हाफीज उपस्थित होते. यावेळी शाळा समितीचे माजी अध्यक्ष मन्सूर मुजावर यांनी रोहा प. स. चे शिक्षण अधिकारी एस.एल.  बंगारे, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच सुरेश जैन, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर व सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
फोटो ओळ – नागोठणे ग्रामपंचायती कडून राजिपच्या शाळेतील विध्यार्थ्यांना गणवेशासह साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी स्थानिक शाळा समिती अध्यक्ष मुजफ्फर कडवेकर, माजी अध्यक्ष मन्सूर मुजावर, मुजफ्फर कडवेकर,उपाध्यक्ष  शबिना रिफाई, सदस्य वासिम बेडोरे, सदस्या शबिना असिफ मुल्ला, रिहाना कुंभार्लीकर आदींसह शाळेच्या मुख्याध्यापिका फातिमा हाफीज आदी.