नागोठणे (महेंद्र माने) : साई सेवक मित्र मंडळ आयोजित नागोठणे ते शिर्डी साईबाबा पालखी व पदयात्रेला रविवार 11 डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात आला असून सदरील पालखी मंगळवार 20 डिसेंबर रोजी शिर्डीला साई दरबारी पोहोचेल. त्यानंतर रविवार 25 डिसेंबर रोजी नागोठणे येथील जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात साई भंडारा होणार आहे. या पालखीचे आ.अनिकेत तटकरे यांनी चिकणी येथे जल्लोषात स्वागत केले.
यावर्षी पालखी व पदयात्रेचे अकरावे वर्ष असून रविवार 11 डिसेंबर रोजी सकाळी ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच्या मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून भजन – कीर्तन व साई गजरात तसेच शहरात घरोघरी स्वागत व पूजन करीत निघालेली ही पालखीचे के एम जी चौकात सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी पालखीचे स्वागत केले.
यावेळी विलास चौलकर, श्वेता चौलकर, दिनेश घाग, सुदाम घाग,शेखर जोगत उपस्थित होते.गवळ आळीतील साईबाबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खुमाचा नाका,छत्रपती शिवाजीमहाराज पेठेत रा.जी. प. सदस्य किशोर जैन यांनी पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर पालखी छत्रपती शिवाजीमहाराज चौक पर्यंत आणण्यात आली. त्यानंतर हजारो साई भक्तांनी पदयात्रेस महामार्गापर्यंत पायी जाऊन शुभेच्छा दिल्या. व पालखी मुंबई – गोवा महामार्गावरून वाकणमार्गे पालीकडे रवाना झाली.
या सोहळ्यात भाई टके,संजय महाडीक,संतोष कोळी,ज्ञानेश्वर साळुंखे,अतुल काळे,प्रणव रावकर यांच्यासह हजारो साईभक्त सहभागी झाले होते.सदरील पालखी चिकणी येथील हॉटेल गुलमोहर येथे आल्यानंतर आ.अनिकेत तटकरे यांनी सचिन कळसकर,विनायक गोळे,सूधाकर जवके,कुणाल तेरडे, सुदर्शन कोटकर यांच्या समवेत पालखीचे जल्लोषात स्वागत करून दर्शन घेतले.
सदरील पालखी मंगळवार 20 डिसेंबर रोजी शिर्डीला साई मंदिरात साईंबाबांचा दर्शन सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार 21 डिसेंबरला साईभक्त नागोठण्याला परतणार असून रविवार 25 डिसेंबर रोजी ग्रामदैवत जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात साई भंडारा होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शंकर भालेकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी- सदस्य तसेच साईभक्त विशेष मेहनत घेत आहेत.
————————————–
सदरील पालखी तिवरे, खोपोली, सुरज ढाबा कार्ला तळेगाव – दाभाडे,राजगुरू नगर,नारायणगाव, बोटा, चंदनपुरी – संगमनेर, कवठे कमलेश्वर आदी ठिकाणी वस्ती होणार आहे. या पदयात्रेत साधारणतः चारशे ते पाचशे साईभक्त सहभागी असून या सोहळ्यात दररोज पहाटे सहा, दुपारी बारा, सायंकाळी सहा आणि रात्री दहा, अशी चारवेळा आरती तसेच भजन घेण्यात येणार आहे.