नागोठणे (महेंद्र माने) : श्री अय्यप्पा सेवा मंडळाच्या वतीने नागोठणे नगरीतील प्रभु आळीमधील चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाच्या जुने रामेश्वर परिसरातील हनुमान मंदिराजवळ रविवार 8 जानेवारी रोजी 26 वा भव्य अय्यप्पा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील सर्वात मोठा समजला जाणारा तसेच दोन वर्षांच्या कोरोना कार्यकाळात अय्यप्पा महोत्सवात झालेल्या खंदानंतर यावर्षी होत असलेल्या महोत्सवात रविवारी पहाटे 05.30 वाजता श्री कूनत्तुमना शशिकुमार नंबुदरी यांच्या शुभहस्ते महा गणपती होम, 06.30 वा. श्री अय्यप्पा स्वामींची प्रतिष्ठापन,07.00 वा.उषा पूजा,11.30 वा. मध्यान्ह पूजा,दुपारी 12.00 वा. पासून अन्न प्रसाद,सायं.04.00 वा. श्री लकारा माधवन कुट्टी आणि मंडळ थ्रिशुर (केरळ) यांच्याकडून थायमपाका सादर,सायं. 06.00 वा. निरमाला विळकू, 06.30 वा.महा दीपाराधना, 07.00 वा. श्री पी. एस. उन्नीकृष्णन आणि मंडळ थ्रिशुर (केरळ) यांच्याकडून अय्यप्पन विळकू हा कार्यक्रम होणार असून रात्री 09.45 वाजता तीर्थप्रसाद,10.00 वा. हरिवरासनमने या महोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती महोत्सव समिती कडून देण्यात आली असून सकाळी 09.00 ते 12.30 व सायं. 04.00 ते 06.00 पर्यंत पुष्पांजलीची व्यवस्था करण्यात आली असून शहर व परिसरातील भाविकांनी या पूजा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री अय्यप्पा पूजा महोत्सव समिती कडून करण्यात आले आहे.