नागोठणे (महेश पवार) : नागोठणे येथील के.एम.जी. विभागातील गवळ आळी येथील रहिवासी तसेच नवरात्र उत्सव मंडळ गवळ आळीचे अध्यक्ष व एक उत्तम वीट भट्टी व्यावसायिक राजेंद्र मारुती चौलकर (वय – ५३) यांचे मोटार वाहन अपघातात जखमी झाल्याने नवी मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना गुरुवार दि.२८ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले.
नागोठण्याचे माजी सरपंच विलास मारुती चौलकर यांचे ते लहान बंधू होत. राजेंद्र चौलकर यांच्या निधनाने नागोठणे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दिवंगत राजेंद्र चौलकर हे अंत्यत मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाचे होते. ते फार कष्टाळू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.