नागोठण्यात ग्रिफिन स्पोर्ट्स् दुकानाचे उदघाट्न

mahesh

नागोठणे (महेश पवार) : खेळा संबंधीत असलेल्या ड्रेससह विविध वस्तूंचा समावेश असलेले व होतकरू तरुण गौरव तुळशीराम म्हात्रे व जय किशोरभाई म्हात्रे यांच्या मालकीचे आणि नागोठणे पोलीस ठाण्याजवळ सुरु केलेले ग्रिफिन स्पोर्ट्स् या दुकानाचे उदघाट्न रविवारी सकाळी ११ वाजता होली एंजल स्कुलचे प्राचार्य विजय मुल्कवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी रोहा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणपतशेठ म्हात्रे, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, भाजपा रोहा तालुका अध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर, आरपीआय तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, युवक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिनेश घाग, भाजपा विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, नारायण म्हात्रे, तुळशीराम म्हात्रे, नथुराम म्हात्रे, प्रभाकर ओव्हाळ, परशराम बैकर, राजेश शेडगे, रमेश शिंदे, राजेंद्र शिर्के, सूर्यकांत राणे, शुभम राणे, सिद्धार्थ थळे, शिवम साळुंखे, मयुरेश खांडेकर, धनराज गणतांडेल आदींसह हितचिंतक व मित्रपरिवार उपस्थित होते.