नागोठणे (महेश पवार) : नागोठणे शहर व विभागातील महिला कार्यकर्त्यांना भाजप पक्षाचे कार्य समजावून सांगा तसेच महिलांना सक्षम बनविण्यासाठी भाजप शिवाय पर्याय नाही असे सांगून नागोठण्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही भाजपच्या महिला नेत्या पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील यांनी दिली. भाजपा नागोठणे शहर अध्यक्षा श्रेया केदार कुंटे यांच्या निवासस्थानी भाजप नागोठणे विभाग महिला आघाडीचा हळदीकुंकू कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्यावेळी उपस्थित महिला वर्गास मार्गदर्शन करताना प्रीतमताई पाटील बोलत होत्या.
यावेळी दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या अध्यक्षा
हेमाताई मानकर, उपाध्यक्षा सौ. वैशालीताई मपारा, रोहा तालुका अध्यक्ष सौ.जयश्रीताई भांड व इतर महिला पदाधिकारी उपस्थितीत होत्या. दरम्यान यावेळी महिला प्रवेश सोहळाही पार पडला .यावेळी तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पक्ष प्रवेश सोहळा पार पडल्यांनंतर महिला वर्गाची विविध पदांवर नियुक्ती करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली यामध्ये रोहा तालुका चिटणीसपदी मनस्वी शिर्के, भाजप नागोठणे विभाग सरचिटणीसपदी निलिमा सुप्रिया शिर्के, उपाध्यक्षपदी वैशाली शेडगे, सोनाली करडे, श्रीमती लीलाबाई अंबाडे, चिटणीसपदी सारिका पवार, रोहा तालुका चिटणीसपदी मनस्वी शिर्के तसेच नागोठणे शहर कार्यकारणी सदस्यपदी सीमा भिडे, जयश्री सहस्त्रबुध्दे आदींचा समावेश आहे.