श्रीवर्धन (विजय गिरी ) : श्रीवर्धन तालुक्यात अत्यवस्थ रुग्णांना मुंबई पुणे येथे नेण्यासाठी गेले कित्येक वर्ष सुसज्ज सर्व सोयी सुविधा असलेली अॅम्ब्यूलन्स नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले होते. 108 अॅम्ब्यूलन्स देखील या आधी श्रीवर्धन रुग्णालयात नव्हती पालकमंत्री नाम अदिती तटकरे यांनी आपल्या स्थानिक आमदार फंडातून सुसज्ज सर्व सोयीयुक्त कर्डियाक अॅम्ब्यूलन्स उपजिल्हा रुग्णालयाला दिली. अॅम्ब्युलन्स चे लोकार्पण त्यांच्याच हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे वैद्यकीय अधिकारी डॉ भरणे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक दर्शन बिचारे उपविभागीय अधिकारी अमित शेंडगे तहसीलदार सचिन गोसावी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महिना आधी पालकमंत्री अदिती तटकरे खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धनला 108 अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अदितीताईनी या रुग्णालयाला व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, डिजिटल एक्स् रे मशीन देवुन सेवा तत्काळ लोकर्पीत केली. अॅम्ब्युलन्स सोबत रुग्णालयात ऑटोमॅटिक हॅन्ड सॅनीटाईझर मशीनचे उद्घाटन देखील करण्यात आले. या वेळी बोलताना ना. अदितीताई म्हणाल्या कि माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करणे हे आमदार या नात्याने माझे कर्तव्य आहे. उपजिल्हा रुग्णालयात आमदार निधीचा उपयोग करून सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका लोकार्पण करताना आनंद होत आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम व सदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा उपकरणाची उपलब्धता करण्यात आपल्याला यश आलेला आहे. डिजिटल एक्स-रे मशीन, कोरोना च्या पार्श्वभूमीवर पर्याप्त ऑक्सिजनचा साठा, व्हेंटिलेटर या सर्व बाबी आजमितीस रुग्णालयात उपलब्ध आहेत. तालुक्यातील रुग्णांची कोणत्या स्वरूपाचे हेळसांड होऊ नये त्यांना उच्च दर्जाचे रुग्णसेवा मिळावी या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असे अदिती ताईंनी सांगितले सांगितले.
उप जिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका आज उपलब्ध आहेत. रायगड मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व रूग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सर्वसामान्य जनतेला निशुल्क आरोग्य सेवा प्रदान करून त्यांच्या आरोग्यविषयक सर्व बाबीसाठी मी आमदार या नात्याने सदैव अग्रणी आहे. 2010 पासून श्रीवर्धन मधील जनतेच्या आरोग्यासाठी सुनील तटकरे साहेब त्यांनी वारंवार पाठपुरवठा केलेला आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन कुटीर रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यात आले. श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्ती आज उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा घेत आहे. येणाऱ्या काळामध्ये जनताभिमुख कामाची परंपरा सदैव अखंडित राहणार आहे.
तीन जूनला झालेल्या चक्रीवादळाने सर्वसामान्य व्यक्ती त्रासला आहे.त्यात कोरोना सारख्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा कठीण प्रसंगी सर्वसामान्य व्यक्तीच्या प्रत्येक अडीअडचणीत सहभागी होणे हे माझं दायित्व आहे. जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार या नात्याने मी कटिबद्ध आहे असे सांगितले रुग्णालयासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्स देताना खूप समाधान वाटत आहे .या ऍम्ब्युलन्स चा कमीत कमी वापर व्हावा असे निरोगी आयुष्य सर्वाना लाभो असे सांगून आपल्या आमदार फंडातून शैक्षणिक व आरोग्य सेवेसाठी जास्तीत जास्त उपयोग करणार असल्याचे सांगितले .कोरोना व चक्रीवादळात सर्व शासकीय तसेच आरोग्य विभगाचे अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गाने खूप मेहनत घेतली त्यामुळेच येथील जनता लवकरात लवकर सावरू शकली असे सांगून सर्वांना धन्यवाद दिले.
या वेळी एका कर्मचाऱ्याचा कोरोना काळात दुर्देवी मृत्यू झालेल्या जलसंपदा विभागातील वेळासकर यांचा मरणोत्तर कोरोना योद्धा म्हणून सन्मान करताना त्यांच्या कुटुंबीयांचा प्राशिपत्र देऊन सन्मान केला. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर कर्डियाक एम्बुलन्स लोकार्पित केली. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सेवा प्राप्त करुन दिल्याने श्रीवर्धन तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःच्या घरी गणरायाचे आगमन झाले असुन देखील जनतेची सेवेला प्राधान्य देत आल्याने श्रीवर्धनची जनता अदीतीताईनां धन्यवाद देत आहे. छोटे खानि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सावंत यांनी केले प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने यांनी केले. नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी मनोगत व्यक्त केले. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे यांनी मानले.