पनवेल (संजय कदम) : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षांमध्ये हजारो महिलांनी रामदास शेवाळे पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये केला भव्य पक्ष प्रवेश केला.
नवीन सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे सौ.आशाताई विचारे ( बाळासाहेबांची शिवसेना उपनेत्या),.विजय नाहटा (बाळासाहेबांची शिवसेना उपनेता), संजय मोरे (सचिव बाळासाहेबांची शिवसेना) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थतीत भव्य महिला मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.
यावेळी सौ. कुंदाताई गोळे सरस्वती महिला संस्था, कळंबोली. सौ.सुलक्षणा ताई जगदाळे महिला पनवेल महानगर प्रमुख, परेश पाटील पनवेल उपजिल्हा प्रमुख, तुकाराम सरक शहर प्रमुख कळंबोली व इतर मान्यवर ,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तसेच येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निर्धार पनवेलजिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी बोलताना व्यक्त केला आहे.