निवडणूक खर्च ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी

grampanchayat

अलिबाग : यावेळी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना पारंपरिक खर्च ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी ॲप तयार केले आहे. ही सेवा उमेदवारांसाठी अडचणीची ठरत आहे. सध्या उमेदवारांना येणाऱ्याअडचणी टाळण्यासाठी निवडणूक खर्च ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मोबाईलमध्ये ऑनलाइन टू व्होटर ॲप डाऊनलोड करून त्यात खर्च सादर करावा लागत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे अँड्राॅईड मोबाईल नाही. तसेच आयोगाचे हे ॲप वरील व्हर्जनच्या मोबाईलमध्येच डाऊनलोड होत आहे. त्याच प्रमाणे अती दुर्गम भागात रेंजचा सुद्धा प्रश्न आहेच आणि रेंज असलीच तर ती 2G किंवा 3G असते, त्यामध्ये डाउनलोड किंवा उपलोड होतच नाही. त्याच प्रमाणे टू व्होटर ॲप एका मोबाईलवर इन्स्टॅाल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण केवळ एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीसाठी करण्याची व्यवस्था आहे. या व्यवस्थेपाई उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा अशी सर्वच स्थरातून मागणी होत आहे.