नागोठणे (महेश पवार) : निवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश जाधव व निवृत्त वन विभाग अधिकारी विकास जाधव यांचे वडील आणि बौध्दजन पंचायत समिती,नागोठणे विभाग शाखा क्रमांक ३ चे माजी कोषाध्यक्ष, पोलिस खात्यातील निवृत्त सहाय्यक फौजदार, सामाजिक कार्यकर्ते रमाई नगर नागोठणेचे रहिवासी भागुराम कृष्णाजी तथा बी.के.जाधव यांचे सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री ११:०० वा.पनवेल येथील एम.जी.एम. रुग्णालयात वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
कै. बी. के. जाधव यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.