कोलाड (श्याम लोखंडे ) : ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. या चक्रीवादळात उध्वस्त झालेल्या फळबागेत आंब्याच्या झाडांना खुंटी कलम करून त्यांना पुन्हा जीवदान देण्याचा काम गोवे येथील फळझाडांवर प्रेम व माळी काम करणारे नंदकुमार शिवराम वाफिलकर करीत असुन अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरु आहे
निसर्ग चक्रीवादळात आंबेवाडी येथील सामाजिक तथा प्रगत शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांच्या शेतावर या चक्रीवादलात आंबे कलम झाडे अर्धवट मोडलेली असून त्यांना पुन्हा जीवदान मिलावा म्हणून त्यांनी माळी नंदकुमार वाफिलकर यांना आपल्या शेतावर बोलावून आपल्या मोडलेल्या आंब्याच्या झाडांना खुंटी कलम करून घेतले.ज्याप्रमाणे टाकाऊ पदार्थ पासून खते तयार केली जातात त्यांच्याप्रमाणे खोडापासून अर्धवट मोडलेले आंब्याचे झाड. हळू हळू सुकून जातात परंतु यांचे खुंटी कलम करून त्या झाडाला जीवदान देण्यासाठी
नंदकुमार वाफिलकर यांनी आपल्या वडिलांकडून भेट कलम,खुंटी कलम करण्याची कला अवगत केली असून त्यांचे वडील शिवराम वाफिलकर( शिवा माळी) या नावाने रायगड जिल्ह्यात सर्वांना परिचित होते.त्यांनी कोलाड नर्सरीमध्ये माळी म्हणून कलम बांधण्याचे काम केले. त्यानंतर त्यांची दोन मुले सुभाष वाफिलकर व नंदा वाफिलकर हे जीर्ण झालेल्या आंब्याचे झाड किंवा मोडलेल्या आंब्याच्या झाडांना खुंटी कळम करून या झाडांना पुन्हा जीवदान देण्याचे काम करत आहेत.