पनवेल (संजय कदम) : कामोठे सेक्टर 36 मधील नीलकंठ स्वीट मार्ट मधून विकत घेतलेली जिलेबी खाल्ल्या नंतर कामोठे वसाहतीमधील एका 4 वर्षीय मुलाला विषबाधा झाला होती, ही विषबाधा होऊन देखील अन्न औषध प्रशासनाने अद्याप स्वीट मार्ट वर गुन्हा दाखल न केल्यामुळे आज जाब विचारण्यासाठी किरण पोवार कुटूंब नीलकंठ स्वीट मार्ट दुकाना समोर उपोषला बसले आहे. नीलकंठ स्वीट मार्ट वर गुन्हा करण्याची मागणी कुटूंबाने केली आहे.
कामोठे सेक्टर 36 मधील रहिवाशी किरण पोवार यांनी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटाने कामोठे सेक्टर 36 मधील नीलकंठ स्वीट मार्ट मधून दोनशे ग्राम जिलेबी विकत घेतली होती. या जीलेबी मध्ये पोवार याना अळ्या दिसून आल्या होत्या. या अळ्या दिसून आले नंतर पोवार यांनी स्वीट मार्ट दुकान मालकाला या घटनेची माहिती दिली.
मात्र दुकान मालकांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन आमच्या दुकानातील नसल्याचे त्यांनी सांगितले. तसच ही जिलेबी खाल्ल्याने पोवार यांच्या 4 वर्ष्याच्या मुलाला फूड पॉयझन झाले होते. त्याच्यावर कामोठे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले याची माहिती अन्न औषध प्रशासनाल आणि पोलिस विभागालाद दिली होती, तसेच लेखी तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली, मात्र पोलीस प्रशासन आणि अन्न प्रशासनाने कारवाई न केल्याने संताप लेल्या पोवार कुटूंबाने आज उपोषणाला बसून नीलकंठ स्वीट मार्ट वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या उपोषणाला किरण पोवार आणि त्याच्या पत्नी बसल्या होत्या. जोपर्यत गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यत उपोषण सुरूच राहील अशी माहिती त्यांनी दिली. जिलेबी खाल्या मुळे माझ्या मुलाला विषबाधा झाली होती. विषबाधे मुळे उलट्या पोटात मळमळणे तसेच जुलाब देखील सुरू झाले होते. डॉक्टर कडे घेऊन गेल्या नंतर विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्या मुळे दुकान मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोवार कुटूंबियांनी केली आहे.
———————————-
नीलकंठ स्वीट मार्ट ला बजावली नोटीस : लक्ष्मण दराडे सहाय्यक आयुक्य अन्न औषध प्रशासन
आमच्या कडे लेखी तक्रार आल्या नंतर आम्ही तत्काळ निळकंठ स्वीट मार्ट ची चौकशी करून कारवाई सुरू केली आहे. तसेच दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
———————————-
माझ्या मुलाचे बरे वाईट झाले असते तर : पोवार कुटूंब