अलिबाग : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, मुंबई विभाग, कोकण भवन नवी मुंबई, दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजता पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे महात्मा फुले सभागृह, पनवेल येथे आयोजित केला आहे.
जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी.पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
या विभागीय महारोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकासाठी जिल्ह्यातील विविध महामंडळे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांविषयीची उमेदवारांना दिली जाणार आहे.
रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या विभागीय महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मुंबई विभागाचे उपआयुक्त श्री.शा.गी. पवार यांनी केले आहे.