नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी यांची पर्सनल वेबसाइटचे ट्विटर अकाऊंट हॅक केले होते. हॅकरने वेबसाइटला हॅक करून तीन ते चार ट्विट सुद्धा केली होती. ज्यामध्ये त्याने कोविड-19 पीएम रिलीफ फंड, बिटक्वॉइन आणि पेटीएम मॉल बाबत लिहिले. रिपोर्टनुसार पीएम मोदींचे पर्सनल वेबसाइटचे ट्विटर अकाऊंट गुरूवारी हॅक झाले असले तरी अचूक वेळ समजलेली नाही. मात्र, हॅकर ने केलेली ट्विट आता डिलीट करण्यात आली आहेत.
पीएम मोदींच्या या ट्विटरवर अकाऊंटवर लिहिले आहे की, मी तुम्हा लोकांना आवाहन करतो की, तुम्ही कोविड-19 साठी बनवण्यात आलेल्या पीएम मोदी रिलीफ फंडमध्ये डोनेट करा. भारताकडे आता क्रिप्टो करन्सी सुद्धा आहे. तेव्हा कृपया तुम्ही 0xae073DB1e5752faFF169B1ede7E8E94bF7f80Be6 #eth #cryptoसाठी बिटकॉइन दान करा.