अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज सव्वाबारा वाजता अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी सज्ज आहे. कार्यक्रमाला १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट दिसणार आहे.
पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत. देशात प्रथमच पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं आहे. अयोध्येत ५ ऑगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाली आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करत आहे.
अयोध्यातील पंतप्रधानांचा कार्यक्रम
* 5 ऑगस्ट सकाळी सुमारे 9.35 दिल्लीतून प्रस्थान
* 10:35 वाजता लखनऊ एयरपोर्टवर लँडिंग
* 10:40 वाजता हेलिकॉप्टरने अयोध्यासाठी प्रस्थान
* 11:30 वाजता अयोध्याच्या साकेत कॉलेज हेलीपॅडवर लँडिंग
* 11:40 वाजता हनुमानगढीला पोहचून 10 मिनिट दर्शन-पूजा
* 12 वाजता राम जन्मभूमी परिसरात पोहणार
* 10 मिनिटात रामलला विराजमानचे दर्शन-पूजा
* 12:15 वाजता रामलला परिसरात पारिजात वृक्षारोपण
* 12:30 वाजता भूमीपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ
* 12:40 वाजता राम मंदिर आधारशिला स्थापना
* 02:05 वाजता साकेत कॉलेज हेलीपॅडसाठी प्रस्थान
* 02:20 वाजता लखनऊसाठी हेलिकॉप्टरने उड्डाण
* लखनऊहून दिल्लीसाठी रवाना