PEN टाइम्स ऑनलाइन टीम : मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार “दर्पणकार” आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण या नावाने 6 जानेवारी रोजी सुरू केले होते. त्यामुळे 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिनाचे औचित्य साधून पेण मधील सुहित जीवन ट्रस्टच्या विशेष मुलांच्या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ पेणच्या पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पत्रकारांचा सन्मान सुहित जीवन ट्रस्ट तर्फे करण्यात आला. सुहीत जीवन ट्रस्ट विद्यार्थ्यांकडून करण्यात येणाऱ्या सुबक वस्तूंची माहिती देण्यात आली. पत्रकार देवा पेरवी, सूर्यकांत पाटील, विजय मोकल, सुनील पाटील, कमलेश ठाकूर, राजेश कांबळे, स्वप्निल पाटील, नरेश पवार, अरविंद गुरव, प्रशांत पोतदार, रूपेश गोडीवले, मितेश जाधव, संतोष पाटील, राजेश प्रधान आदी पत्रकार उपस्थीत होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देवा पेरवी म्हणाले की, पेणच्या सुबक कलेच्या गणेश मुर्त्यांमुळे पेणचे नावं सातासमुद्रापलीकडे पोहचले आहे, याचं प्रमाणे सुहीत जीवन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुबक अश्या कला कुसरीच्या वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळून या वस्तू ही साता समुद्रापलीकडे जाऊन पेणच्या सूहित जीवन ट्रस्ट व विद्यार्थ्यांचे नाव व्हावे असे प्रतिपादन पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा पत्रकार देवा पेरवी यांनी केले.
सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ.सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिक्षिका नैनिता पाटील, प्रिती म्हात्रे, प्रियांका ढवळे, दक्षिता काटकर, संजना पाटील, सुरेखा म्हात्रे, प्रतीक्षा म्हात्रे, समिधा वांद्रे, प्रतिभा पाटील, लिनिमा पाटील, अमोल काइनकर, भूषण ढवळे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.