अलिबाग : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कराेनामुळे अकस्मात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना आदेश दिल्याचे तसेच पत्रकार कै.श्री संतोष पवार यांच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी श्री.संतोष पवार यांच्या तब्येतीबद्दलची माहिती मिळाल्यानंतर त्यांना तातडीने डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्याच्या व पुढील उपचारांची सर्व व्यवस्था तयार ठेवण्यात आली होती. यासाठी खासदार सुनिल तटकरे यांनी स्वत: डी.वाय.पाटील रुग्णालयाशी संपर्क साधला होता. मात्र दुर्दैवाने रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच श्री.संतोष पवार यांचे निधन झाले.
नागरिकांनी कराेना पार्श्वभूमीवर स्वतःची अधिक काळजी घ्यावी, सर्दी, खाेकला किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून स्वतःची तपासणी करून घ्यावी, प्राथमिक आराेग्य केंद्रांपर्यंत कराेना तपासणी यंत्रणा उभी करण्यात आली असून स्वतःची करोना तपासणी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे यावे,असे आवाहनही त्यांनी केले आहे.