पनवेलमध्ये काँग्रेसला मोठा झटका; प्रदेश युवक काँग्रेसचे माजी जनरल सेक्रेटरी व माजी नगरसेवक सिद्धार्थ बंठिया यांचा भाजपामध्ये प्रवेश

prashant-thakur.1
पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश युवक काँग्रेसचे माजी जनरल सेक्रेटरी व पनवेलचे माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ जवळ केले आहे. भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन सिद्धार्थ बंठिया यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.
दादर येथील भाजप कार्यालय वसंतस्मृति येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी असे भरगच्च नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ बंठिया यांनी भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले आहे.
यावेळी पनवेल शहराध्यक्ष व माजी नगरसेवक जयंत पगडे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, बबन मुकादम, हरेश केणी, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका चारुशीला घरत, शहर खजिनदार संजय जैन यांच्यासह कपिल बोरा, निखिल मुनोथ, देवेंद्र अचलिया, भावीन जैन आदींसह सिद्धार्थ बांठिया यांचे समर्थक उपस्थित होते. पनवेल नगरपरिषदेत सिद्धार्थ बांठिया यांची बांधकाम सभापती म्हंणून कारकीर्द गाजली. त्यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा निश्चितच भाजपला होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *