पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरातील नवाब चाळ ,पाण्याच्या टाकीजवळ पटेल मोहल्ला येथे राहणाऱ्या पटेल कुटुंबातील पाच जण लग्नाला जातो असे सांगून घरा बाहेर पडले ते अद्याप घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
दरम्यान या घटने मुले पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे. मोहम्मद अझर अब्दुल्ला पटेल (वय ४८) उंची पाच फूट ,रंग सावळा ,केस सफेद काळे , नाक सरळ ,चेहरा उभट, दाढी थोडी वाढलेली असून अंगात काळी पँट व लाईट कलरचा शर्ट घातला आहे.
शबीना अझर पटेल (वय ३७) , उंची ४.०५ फूट ,रंग सावळा ,केस काळे ,नाक सरळ , चेहरा उभट असून , अंगात सोनेरी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे .
अरफा अंझर पटेल (वय – १५) , उंची चार फुट पाच इंच, रंग गोरा, केस काळे, नाक बसके, जाडसर चेहर उभट, अंगात नेसुन पंजाबी ड्रेस रंग माहीत नाही .
अझर अंझर पटेल, (वय १२ ), उंची चार फुट, रंग गोरा, केस काळे, नाक सरळ अंगाने सडपातळ, चेहरा उभट, अंगात नेसुन जिन्स पॅन्ट व शर्ट रंग माहीत नाही.
हे बेपत्ता झाले असून यामध्ये कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर – ०२२-२७४५२३३३ किंवा पोहवा एन . आर. वाघमारे यांच्या शी संपर्क साधावा