पनवेल (संजय कदम) : पनवेल को-ऑप अर्बन बँक निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील व सचिव सुदाम पाटील यांनी मतदारांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.
यासंदर्भात त्यांनी आभारपत्रक काढून सर्व उमेदवारांना विजयी केल्याबद्दल तमाम मतदारांचे, व्यापारी तसेच या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्त्याचे आभार मानले आहेत.