पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील नितळस ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आली असून, थेट सरपंचपदी निकिता संदीप पाटील व सदस्य संजय सांगडे, महेश पाटील, अर्पणा पाटील, संजय संजय सांगडे आदि उमेदवार निवडून आले. तसेच चींध्रण ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सदस्य म्हणून मनोज कुंभारकर, जीवन मधुकर पाडेकर, कुसुम आत्माराम पाटील निवडून आले आहेत.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमूख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, माजी सरपंच परशुराम भोपी, माजी सरपंच सुनिल काठे, एकनाथ पाटील, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, विभाग संघटक जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.